Politics in Maharastra-01
महाराष्ट्र राजकारण: मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे. भाजपला दूर ठेवून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादीनं घेतला असून आजच तिन्ही पक्षाकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. हे सगळं सुरू असतानाच भाजपनं आता शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर देल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळं आज महाराष्ट्रात हालचालींना वेग येणार आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडींची मालिका सुरूच असून उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल ९ तासांनी अजित पवार यांनी बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरातून बाहेर पडत थेट काकांचं अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं घर गाठलं आहे. भगिनी सुप्रीया सुळे यांनी अजितदादांचं तिथे स्वागत केलं. अजितदादा परतले... काहींची धास्ती वाढली! अजित पवार भाजपच्या वळचणीला जाऊन बसल्याने त्यांतील अनेकांना प्रचंड हर्षवायू झाला होता. काही जणांनी तर शनिवारी सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थाबाहेर 'अजित पवार मुर्दाबाद'च्या घोषणाही दिल्या होत्या. यात ठाण्य...